Saturday, 7 January 2012

माझे विचार

माझ्या मनात  कायम येणारे विचार ज्यांचा आपणास फायदा होऊ शकतो.
१. गतीचे नियम माणसाच्या आयुष्यात सुद्धा लागू पडतात , जसे कर्म तसे फळ , म्हणून चांगले कर्म करा चांगलीच फळे मिळतील .
२. जीवनातील खरे हिरो हे कष्टकरी वर्गच आहे त्यांच्या मेहनती वर हे जग चालते. आणि त्यांनाच त्याचा मोबदला कमी मिळतो . जसे मजूर , हमाल, ड्रायवर, शिपाई ,वैगरे  बाकी सगळे बुद्धीमत्तेने श्रीमंत असतात.
३. पत्नी हि आयुष्याची सोबतीण असते, बाकी नाती जन्मजात असतात . म्हणून तिचा आदर करा .
४. जीवनात कष्ट केल्या विना सहज काही मिळत नाही.
५. आयुष्यात बर्याच जणांना आपण कश्या   साठी जगत आहे हे मरेपर्यंत काळात नाही, मरण येत नाही म्हणून जगत असतो .
६. विचार करणे हे जिवंत माणसाचे लक्षण .
७. लाइफ , वाइफ , आणि जॉब दुसऱ्याचीच, चांगली वाटते आपली कितीही चांगली असुद्या.
८. तरुणी कडे बगताना ती ८० वर्षाची  असल्याचा विचार करावा म्हणजे सौंदर्या क्षण भंगरुता कळेल. परवीन बॉबी चे उदाहरण आहेच.
९.  इलेक्ट्रोनिक माध्यामनी माणूस पुरता गुरफटून गेला आहे टीवी, कॉम्पुटर ,इंटरनेट , mobile  वीज , या शिवाई त्यांचे जीवन असूच शकत नाही.
१०. उतपत्ती, स्थिथी, आणि लय पृथ्वीवर सर्वाना च लागू पडतात
११. घडणाऱ्या अटल गोष्टी माणूस काही केल्या टाळू शकत नाही.
१२. इतिहासाचा खोटा अभिमान बाळगण्यात काही अर्थ नसतो ,त्यातून काही प्रेरना काही आदर्श घायचे असतात .
१३. जीवन किती क्षणभंगूर, असते तरी माणसाला किती गर्व असतो , वास्तविक कोणा वाचून कोणतीच गोष्टा अडत नसते.
१४.  पृथ्वी वर प्रत्येक गोष्टीचे एक महाविश्व असते , काही घेतले तर त्याचे असंख्य प्रकार आपल्याला भेटतात.
१५. पृथ्वी वरील प्रत्येक माणूस कामाचा आहे, प्रत्येक माणसात काही ना काही खुभी असतेच.
१६. जगात कोणतेही काम माणूस एकटा करू शकत नाही, त्याला मानव समूहाच्या शक्तीची गरज लागतेच.
१७. तरुणा साठी जगात आइश या शब्द्या शीवाई अनेक शब्द आहेत त्याग, कष्ट्या, देश , समाज, नीतीमत्ता .
१८. देवांना माणसा प्रमाणे स्वताचे अस्तित्व असेल का? देव एक आहे तर जगात एवडे धर्म का ?
२०. देव सर्व शक्तिमान आहे ,देणारा आहे तर, मंदिरात जाऊन मागण्याची गरज काय, त्याला आपल्या सर्व मागण्या माहित नसतील का? सर्व देणारा तोच असेल तर आपण त्याला काय देणार , फक्त नामस्मरण पुरेसे नाही का ?
२१ मला वाटते आणखी २५ वर्षांनी माणूस आपली कामे घरी बसून ९० % कामे इंटरनेट द्वारे करेल, स्वास्थ्य आणि इतर १०% कामा साठीच तो बाहेर पडेल.
२२. टि वी मूळे कुटुंबातील सवांद बंद होत चालले आहेत. तांत्रिक प्रगती मूळे एक मेकातील प्रेम कमी होत चालले आहे. नात्यांना कोरडेपणा आला आहे.
२३. माणूस जन्माला आल्यापासून मरे पर्यंत एकटाच असतो .
२४. इंटरनेट मध्ये जबरदस्त ताकद आहे , परंतु काही दिवसात इंटरनेट व्यसन मुक्ती केंद्रे चालू होतील .
२५. आणखी  २५ -५० वर्षात सर्व जग सुशीक्षित  झाले तर ते चालणार कसे , labour  काम करणार कोण , किवा त्यासाठी काही पात्रता लागेल?
२६. माणूस दिवसातले कमीत कमी १० तास टी वी , कॉम्पुटर समोर असतो आणखी १५ -२० वर्षांनी आपल्या डोळ्यांची, शरीराची , काय अवस्था असेल?
२७ प्रत्येक जन कश्या च्या तरी मागे लागलेला आहे हि भागम भाग थांबणार कधी?
२८ .मानवी जन्माचे उद्दिष्ट्य तरी नक्की काय आहे ?
२९.पाप करताना माणसाला भीती का वाटत नाही कि हे सर्व इथेच फेडायचे  आहेत.
३०. शिवाजी महाराजांनी असा platform  उपलब्ध करून दिला कि, मराठी माती मधून असंख्य हिरे जन्माला आले कि ज्यांनी महाराष्ट्राचे नाव जगाच्या काना कोपर्यात नेले. 
३१. देव जर सर्वाना चालवत असेल तर  एका क्षणात होणाऱ्या अब्जावधी घटनांना तो कसे नियंत्रित करत असेल .
३२. इ कचरा हि भविष्यातील नवीन समस्या असेल.
३३. देव  कुणालाच पूर्ण सुख देत नाही , काही तरी अपूर्नंता ठेवतोच.
३४. पूर्ण स्वास्थ्य माणसात हि काही तरी व्यंग असतेच.
३५. जगात कोणीच सुखी नाही.
३६. माणसाचे प्रश्न तो संपल्या शिवाय संपत नाही.
३७. आपल्या पेक्षा खाली बगीतले तर माणूस सुखी राहतो, नाही तर कायम दुखी.
३८. महाराजांना मानले पाहिजे इतक्या स्वकीय आणि परकीय प्रश्नातून स्वराज्य उभे केले.
39. बालपणा सारखा सुखी काळ नाही ,१० वर्षे पर्यंत.
४०.दिवाळी मधील फताखा, हा प्रकार काडून टाकला पाहिजे त्याचा तसा कुणालाच फायदा  नाही, उलट हि सर्व रक्कम समाज उपयोगी कामासाठी लावली तर चांगले होईल, या साठी समाज जागृती आवशक आहे.
४१. जीवनात  काही तरी change  आवश्यक आहे , रोज त्याच गोष्टीना माणूस कताळतोच
४२. मागच्या पिढीच्या त्याग आणि कष्टावर पुढील पिढी सुखी होत असते.
४३. दिवाळी आणि इतर सण मध्यम आणि उच्च वर्गा साठी असतात, बाकी हातावर पोट असणार्या जनतेला पोटाचा प्रश्न पडलेला असतोच.
४४. हातावर पोट असलेलेल्या जनतेची बहुतेक आयुष्य कडून फारश्या अपेक्षा नसाव्यात.
४५.कोणत्याही गोष्टीच्या मूळाशी फक्त एक गोष्ट असते ती म्हणजे त्या गोष्टीचा  "विचार".
४६.Everyone  is  planted  in  his  position  ,and  playing  his  role .
४७. every  one  is  running  in  rat  race  in  this  world  , no one  know  where  is  end .
४८. ज्याचे भोग त्यांनीच भोगायचे असतात .
४९. आयुष्या साठी ज्याची saving  करायची ती मनुष्य कधीच करत नाही, ती म्हणजे शरीर स्वास्थ्य (फिटनेस) , कारण शरीर जर चांगले असेल तर बाकी save  केलेल्या गोष्टीचा तो आनंद घेऊ शकतो.
५०. माणूस कसा घडतो हे त्याचे संस्कार आणि बाजूच्या वातावरणावर अवलंबून असतो , आजूबाजूच्या वातावरणाचा बराच परिणाम त्याच्यावर होत असतो.
५१. देवदर्शनाला जाताना अपघात का होतात हा मला कायम पडणारा प्रश्न आहे?
५२. समाज्यातील खालील सर्वाना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाले तर खूप साऱ्या प्रतिभा बाहेर येतील.



















Saturday, 29 October 2011

पानीपत एक राष्ट्रीय स्मारक


विजयादशमी   ऑक्टोबर २०११                
२००५ मधे मुलाखतीच्या निमित्ताने दिल्लीला जाण्याचा योग आला. आणि त्यानंतर हि  , वेला कामानिमित्त दिल्लीला जाणे झाले. परंतु तेव्हा एकदाही असा विचार केला नाही की हीच दिल्ली १८ व्या शतकात मराठयानी  गाजवली आहे.  ता १८ सेप्तेम्बेर २००९ ला कामा निम्मित  दिल्लीच्या पुढे  जाणे झाले अणि पुढे एक दोन वर्षे पंजाब अणि हरियाणा मधे रहाण्याचा योग आला .
१८ september  ला दिल्ली वरून अम्बाला येथे गेलो अणि मधे  पानीपत लागले अणि सर्व इतिहासाच्या आठवणी जाग्या झाल्या.आणि मराठी शहीदाना मानाचा मुजरा करून  लवकरच प्रतक्ष्य रणभूमी वर  भेट देण्याचा निश्चय करून पुढे गेलो. खुप अभिमान वाटला ह्या रस्त्याने पुढे जाताना  वाटले १८ व्या शतकात याच भूमीवर मराठी घोड्याची पावले पडली
  आणि  लवकरच पानीपत युद्धभूमीला भेट देण्याचा योग जुळून आला निम्मित होते पानिपतच्या युद्धास २५० वर्षे पूर्ण , १४ जानेवारी  २०११, असे क्षण मी सहसा सोडत नाही.सकाळी पहाटे चार वाजता उठून पंजाब राजपुरा वरून निघून सकाळी वाजताच पनिपतला काला आम्ब या स्मारक स्थली पोचलो . उत्तर भारतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी मधे भयंकर ठंडी असते. जाताना विचार केला या भयंकर थंडीत अपूऱ्या कपड्यानिशी आणि उपाशीपोटी आपले पूर्वज कसे काय लढले असतील? कल्पनाही  करू शकत नाही कारण या काळात येथे सूर्य दर्शन  क्वचितच होते.  पूर्ण दिवस सुद्धा स्वेटर शिवाय पर्याय नसतो  पूर्ण प्रवास युद्धाचे कल्पना चित्र उभे करण्यातच गेला.
   परंतु प्रत्यक्ष रणभूमीला भेट देवून  अपेक्षा भंगच झाला. २५० वर्षानिमित्त खुप गर्दी आणि  भव्य स्मारकाची अपेक्षा होती. परन्तु - एकर जागेत स्मारक स्तम्भा आनी garden  develop केली आहे.आणि  गर्दी हि  १००० ते १५०० पेक्षा जास्त नव्हती.त्यात मराठी लोक  ५०० ही  नसतील .मुळात पानिपत मधे असे काही ठिकाण आहे हे तेथील बर्याच लोकांना माहिती नाही.










    हरियाणा मधे रोड मराठा समाज आहे , ते पानीपत लढाई नंतर तेथेच स्थायिक ज़ालेल्या मराठी सैनिकाचे वंशज आहेत. हे कोल्हापुर चे डॉ वसंतराव मोरे यांनी सिद्ध केले आहे.  त्यांचे  एक पुस्तक आहे रोड मराठा इतिहासावर सोबत पुस्तकाचे मुखपृष्ट दिले आहे. आज रोड मराठा हरयाणा मधे ते लाख लोकसंखेने आहे आणि हरयाणा या राज्यात सर्वात जास्त मराठी लोक राहतात.  तर या बांधवानी पानीपत शौर्य समारोह एक कार्यक्रम  आयोजित केला होता. याच कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर आणि अनेक रोड मराठा बांधवांची ओळख झाली. महाराष्ट्रातुन बरेच मराठी मान्यवर या कार्यक्रमासाठी येथे आले होते. प्रतिभा पाटिल ही येणार होत्या काय झाले माहिती नाही?
    नंतरही कुरूक्षेत्रावरून पानीपतला बऱ्याच वेळा जाणे झाले, पूजेसाठी तेथील  माती आणली, असेच एका भेटीमध्ये मधे रोड मराठा नेते वीरेंद्र वर्मा यांची ओळख झाली. हे लोक अभिमानाने नावापुढे मराठा लावतात. जसे मराठा वीरेंदर वर्मा, मराठा धरमसिंह, छत्रपति  शिवाजी मराठा. आणि यांच्या घरी  महाराजाचे फोटो पाहून धन्य झालो.
त्यांच्याशी बरीच चर्चा झाली. १४ जानेवारीच्या कार्यक्रमात भव्य स्मारक उभारण्याची घोषणा झाली होती. स्मारकाची त्यांची कल्पना खुप आवडली, स्मारक पूर्ण ध्वनी चित्र परिणाम युक्तः असले पाहिजे.  पूर्ण वर्णन युद्ध वर्णन ध्वनी चित्र पूर्ण आणि देखाव्या सह उभारले गेले पाहिजे .संपूर्ण युद्धाचे वर्णन पाहून आत गेला माणूस दोन तीन तासात रक्त सळसळत बाहेर आला पाहिजे की आपुण हि काही तरी केले पाहिजे कारण मराठे केवळ ते केवळ राष्ट्रभावने साठी. कारण ज्या हिंदुस्तान च्या गादीला पूर्ण देश मानत होता त्या गादीच्या रक्षणा साठी मराठे लढले आणि धर्म निरपेक्ष राष्ट्राचा पाया १८ व्या मराठ्यांनी घातला आहे.या स्मारका साठी सर्व भारतीयांनी प्रयत्न करणे आवशक आहे .
    नंतरच्या पानीपत भेटी मधे पानीपत museum बघितले,  ते  रोहतक रोडवर नहर कालोनी मधे आहे. येथे पानीपत च्या तिन्ही युद्धाचे सचित्र वर्णन आहेभाऊची  पुण्याला लिहिलेली पत्रे आणि  भाऊ ज्या काला आम्ब झाडाखाली लढाईत पडले त्या वृक्षापासून बनवलेला दरवाजा आहे. हे musem नंतर काला आम्बला स्थलातंरीत होणार आहे . सध्या तेथे ईमारत नाही. खुप अभिमान वाटतो येथे आल्यावर की इतके लांब येउन आपल्या पुर्वाजनी पराक्रम केला . १८ व्या शतकात  हिंदुस्तान वर मराठी सत्ता होती. त्यांच्या निर्णया शिवाय दिल्लीचे पान हि हलत नव्हते. 
कुंजपुरा अनि कुरुक्षेत्र 
या ठिकाणी राहताना खुप अभिमान वाटत होता कि आपन बलिदान भूमीवर राहत आहोत, हजारो अनामिक मराठी वीरांनी या भूमीवर  स्वातंत्र्या साठी बलिदान केले आहे , ३०० वर्षापूर्वी   येथे  येउन लढण्याची प्रेरणा केवळ शिवाजी महाराजाची होती. पानीपत अनि कुंजपुरा पासून काही अंतरावर कुरूक्षेत्रा येथे मी राहत होतो जी केवळ बलिदानाची भूमी आहे. याच भूमीवर हिंदुस्तानच्या स्वांतत्र्यासाठी, धर्मासाठी महायुद्धे झाली.
. कुरुक्षेत्र -कौरव अनि पांडव 
. तरावडी- पृथ्वीराज चौहान अनि घोरी ११९१-दोन वेळा 
.पानीपत- मराठे अनि अब्दाली १७६१
.कुंजपुरा -मराठे अनि अब्दाली याच ठिकाणी १९ ऑक्टोबर १७६० या दिवशी कुंजुपुरा वर दसऱ्याच्या आसपास भगवा फडकला आणि मराठी सेनेने पानीपत च्या दिशेने मोर्चा वळवला .
ही सर्व ठिकाणे माझ्यापासून काही अंतरावर होती. खुप अभिमान वाटतो .

    परंतु खंतही वाटते राष्ट्रीय अस्मितेसाठी बलिदान देऊन ही मराठी माणसाने मराठी पराक्रमाची उपेक्षा केली आहे. प्रत्येक मराठी माणसाने या वीरभूमीला भेट दिली पाहिजे आणि  पानीपत हे मराठी शौर्याचे राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे. उत्तर भारतात येणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने वेळ काढून या वीरभूमीला भेट दिलीच पाहिजे, पुणे पानीपत ही रेलवे सेवा सुरु केली  पाहिजे. ही सेवा Duranto किवा शताब्दी सेवेसारखी पाहिजे, या ट्रेन मधे १८ व्या शतकातला मराठी  इतिहास सादर केला पाहिजे. आणि प्रत्येक भारतीयाला मराठी शौर्याची आणि त्यागाची कहानी समजली पाहिजे, यासाठी मराठी नेत्यांनी प्रयत्न केला पाहिजे. अगोदर त्याना मराठी त्यागाची जाणीव झाली पाहिजे. आनी दर वर्षी १४ जानेवारीला पानीपत मधे  शौर्य उत्सव साजरा केला पाहिजे हीच खरी तमाम मराठी शहीद वीरांना श्रद्धांजली ठरेल.  आणि पानीपत वर पराभव झाला जे मराठी मनात बसले आहे ते पुसून काढले पाहिजे . अधिक माहितीसाठी वाचा पानीपत पराभवाची विजयाची कहानी .
       जाता जाता  ही मराठी शौर्याची उपेक्षा जाणवण्याचे कारण शिख संस्कृतीच जवळून  अभ्यास सर्व शीख लोक आजही सर्व धार्मिक नियम काटेकोरपणे पाळतात जे की १६ ते १८ व्या शतकाला अनुसरून होते. प्रत्येक शीख माणूस आयुष्यात एकदा तरी अमृतसर आणि नांदेडला त्याची परिस्थिति कशीही असो. स्वतः २००८ मधे  गुरु गोविन्द सिंघाच्या  ३०० व्या पुण्यतिथि निमित्त ट्रक भरून शीख लोक नांदेडला गेल्याचे पाहिले आहे. मनमोहन सिंह सुद्धा या कार्यक्रमाला  उपस्थित होते. त्यांचा धर्मा विषयी प्रचंड अभिमान आहे.
   सहजच एक विचार मनात येतो जर हे पानिपतचे  तिसरे युद्ध अब्दाली आणि शीखा मधे झाले  असते तर आज तेथे खुप मोठा गुरुद्वारा उभा असता , हजारो लोक लंगर मधे जेवले असते. आणि  पनिपतला सचखंड  सारखी ट्रेन सुरु असती. वास्तविक मराठी त्यागा मुळेच शीखाचा पुढचा मार्ग सुकर झाला आहे.
त्या मुळे प्रत्येक मराठी माणसाने पनिपतला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्याच पराक्रमाची उपेक्षा आपण थांबवली पाहिजे. आणि पानीपत हे राष्ट्रीय स्मारक जाले पाहिजे.
जय महाराष्ट्र