विजयादशमी ६ ऑक्टोबर २०११
२००५ मधे मुलाखतीच्या निमित्ताने दिल्लीला जाण्याचा योग आला. आणि त्यानंतर हि २,३ वेला कामानिमित्त दिल्लीला जाणे झाले. परंतु तेव्हा एकदाही असा विचार केला नाही की हीच दिल्ली १८ व्या शतकात मराठयानी गाजवली आहे. ता १८ सेप्तेम्बेर २००९ ला कामा निम्मित दिल्लीच्या पुढे जाणे झाले अणि पुढे एक दोन वर्षे पंजाब अणि हरियाणा मधे रहाण्याचा योग आला .
१८ september ला दिल्ली वरून अम्बाला येथे गेलो अणि मधे पानीपत लागले अणि सर्व इतिहासाच्या आठवणी जाग्या झाल्या.आणि मराठी शहीदाना मानाचा मुजरा करून लवकरच प्रतक्ष्य रणभूमी वर भेट देण्याचा निश्चय करून पुढे गेलो. खुप अभिमान वाटला ह्या रस्त्याने पुढे जाताना वाटले १८ व्या शतकात याच भूमीवर मराठी घोड्याची पावले पडली.
आणि लवकरच पानीपत युद्धभूमीला भेट देण्याचा योग जुळून आला निम्मित होते पानिपतच्या युद्धास २५० वर्षे पूर्ण , १४ जानेवारी २०११, असे क्षण मी सहसा सोडत नाही.सकाळी पहाटे चार वाजता उठून पंजाब राजपुरा वरून निघून सकाळी ९ वाजताच पनिपतला काला आम्ब या स्मारक स्थली पोचलो . उत्तर भारतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी मधे भयंकर ठंडी असते. जाताना विचार केला या भयंकर थंडीत अपूऱ्या कपड्यानिशी आणि उपाशीपोटी आपले पूर्वज कसे काय लढले असतील? कल्पनाही करू शकत नाही कारण या काळात येथे सूर्य दर्शन क्वचितच होते. पूर्ण दिवस सुद्धा स्वेटर शिवाय पर्याय नसतो पूर्ण प्रवास युद्धाचे कल्पना चित्र उभे करण्यातच गेला.
परंतु प्रत्यक्ष रणभूमीला भेट देवून अपेक्षा भंगच झाला. २५० वर्षानिमित्त खुप गर्दी आणि भव्य स्मारकाची अपेक्षा होती. परन्तु २-३ एकर जागेत स्मारक स्तम्भा आनी garden develop केली आहे.आणि गर्दी हि १००० ते १५०० पेक्षा जास्त नव्हती.त्यात मराठी लोक ५०० ही नसतील .मुळात पानिपत मधे असे काही ठिकाण आहे हे तेथील बर्याच लोकांना माहिती नाही.
हरियाणा मधे रोड मराठा समाज आहे , ते पानीपत लढाई नंतर तेथेच स्थायिक ज़ालेल्या मराठी सैनिकाचे वंशज आहेत. हे कोल्हापुर चे डॉ वसंतराव मोरे यांनी सिद्ध केले आहे. त्यांचे एक पुस्तक आहे रोड मराठा इतिहासावर सोबत पुस्तकाचे मुखपृष्ट दिले आहे. आज रोड मराठा हरयाणा मधे ६ ते ७ लाख लोकसंखेने आहे आणि हरयाणा या राज्यात सर्वात जास्त मराठी लोक राहतात. तर या बांधवानी पानीपत शौर्य समारोह एक कार्यक्रम आयोजित केला होता. याच कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर आणि अनेक रोड मराठा बांधवांची ओळख झाली. महाराष्ट्रातुन बरेच मराठी मान्यवर या कार्यक्रमासाठी येथे आले होते. प्रतिभा पाटिल ही येणार होत्या काय झाले माहिती नाही?
नंतरही कुरूक्षेत्रावरून पानीपतला बऱ्याच वेळा जाणे झाले, पूजेसाठी तेथील माती आणली, असेच एका भेटीमध्ये मधे रोड मराठा नेते वीरेंद्र वर्मा यांची ओळख झाली. हे लोक अभिमानाने नावापुढे मराठा लावतात. जसे मराठा वीरेंदर वर्मा, मराठा धरमसिंह, छत्रपति शिवाजी मराठा. आणि यांच्या घरी महाराजाचे फोटो पाहून धन्य झालो.
त्यांच्याशी बरीच चर्चा झाली. १४ जानेवारीच्या कार्यक्रमात भव्य स्मारक उभारण्याची घोषणा झाली होती. स्मारकाची त्यांची कल्पना खुप आवडली, स्मारक पूर्ण ध्वनी चित्र परिणाम युक्तः असले पाहिजे. पूर्ण वर्णन युद्ध वर्णन ध्वनी चित्र पूर्ण आणि देखाव्या सह उभारले गेले पाहिजे .संपूर्ण युद्धाचे वर्णन पाहून आत गेला माणूस दोन तीन तासात रक्त सळसळत बाहेर आला पाहिजे की आपुण हि काही तरी केले पाहिजे कारण मराठे केवळ ते केवळ राष्ट्रभावने साठी. कारण ज्या हिंदुस्तान च्या गादीला पूर्ण देश मानत होता त्या गादीच्या रक्षणा साठी मराठे लढले आणि धर्म निरपेक्ष राष्ट्राचा पाया १८ व्या मराठ्यांनी घातला आहे.या स्मारका साठी सर्व भारतीयांनी प्रयत्न करणे आवशक आहे .
नंतरच्या पानीपत भेटी मधे पानीपत museum बघितले, ते रोहतक रोडवर नहर कालोनी मधे आहे. येथे पानीपत च्या तिन्ही युद्धाचे सचित्र वर्णन आहे, भाऊची पुण्याला लिहिलेली पत्रे आणि भाऊ ज्या काला आम्ब झाडाखाली लढाईत पडले त्या वृक्षापासून बनवलेला दरवाजा आहे. हे musem नंतर काला आम्बला स्थलातंरीत होणार आहे . सध्या तेथे ईमारत नाही. खुप अभिमान वाटतो येथे आल्यावर की इतके लांब येउन आपल्या पुर्वाजनी पराक्रम केला . १८ व्या शतकात हिंदुस्तान वर मराठी सत्ता होती. त्यांच्या निर्णया शिवाय दिल्लीचे पान हि हलत नव्हते.
कुंजपुरा अनि कुरुक्षेत्र
या ठिकाणी राहताना खुप अभिमान वाटत होता कि आपन बलिदान भूमीवर राहत आहोत, हजारो अनामिक मराठी वीरांनी या भूमीवर स्वातंत्र्या साठी बलिदान केले आहे , ३०० वर्षापूर्वी येथे येउन लढण्याची प्रेरणा केवळ शिवाजी महाराजाची होती. पानीपत अनि कुंजपुरा पासून काही अंतरावर कुरूक्षेत्रा येथे मी राहत होतो जी केवळ बलिदानाची भूमी आहे. याच भूमीवर हिंदुस्तानच्या स्वांतत्र्यासाठी, धर्मासाठी महायुद्धे झाली.
१. कुरुक्षेत्र -कौरव अनि पांडव
२. तरावडी- पृथ्वीराज चौहान अनि घोरी ११९१-दोन वेळा
३.पानीपत- मराठे अनि अब्दाली १७६१
४.कुंजपुरा -मराठे अनि अब्दाली याच ठिकाणी १९ ऑक्टोबर १७६० या दिवशी कुंजुपुरा वर दसऱ्याच्या आसपास भगवा फडकला आणि मराठी सेनेने पानीपत च्या दिशेने मोर्चा वळवला .
ही सर्व ठिकाणे माझ्यापासून काही अंतरावर होती. खुप अभिमान वाटतो .
परंतु खंतही वाटते राष्ट्रीय अस्मितेसाठी बलिदान देऊन ही मराठी माणसानेच मराठी पराक्रमाची उपेक्षा केली आहे. प्रत्येक मराठी माणसाने या वीरभूमीला भेट दिली पाहिजे आणि पानीपत हे मराठी शौर्याचे राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे. उत्तर भारतात येणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने वेळ काढून या वीरभूमीला भेट दिलीच पाहिजे, पुणे पानीपत ही रेलवे सेवा सुरु केली पाहिजे. ही सेवा Duranto किवा शताब्दी सेवेसारखी पाहिजे, या ट्रेन मधे १८ व्या शतकातला मराठी इतिहास सादर केला पाहिजे. आणि प्रत्येक भारतीयाला मराठी शौर्याची आणि त्यागाची कहानी समजली पाहिजे, यासाठी मराठी नेत्यांनी प्रयत्न केला पाहिजे. अगोदर त्याना मराठी त्यागाची जाणीव झाली पाहिजे. आनी दर वर्षी १४ जानेवारीला पानीपत मधे शौर्य उत्सव साजरा केला पाहिजे हीच खरी तमाम मराठी शहीद वीरांना श्रद्धांजली ठरेल. आणि पानीपत वर पराभव झाला जे मराठी मनात बसले आहे ते पुसून काढले पाहिजे . अधिक माहितीसाठी वाचा पानीपत पराभवाची विजयाची कहानी .
जाता जाता ही मराठी शौर्याची उपेक्षा जाणवण्याचे कारण शिख संस्कृतीच जवळून अभ्यास सर्व शीख लोक आजही सर्व धार्मिक नियम काटेकोरपणे पाळतात जे की १६ ते १८ व्या शतकाला अनुसरून होते. प्रत्येक शीख माणूस आयुष्यात एकदा तरी अमृतसर आणि नांदेडला त्याची परिस्थिति कशीही असो. स्वतः २००८ मधे गुरु गोविन्द सिंघाच्या ३०० व्या पुण्यतिथि निमित्त ट्रक भरून शीख लोक नांदेडला गेल्याचे पाहिले आहे. मनमोहन सिंह सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचा धर्मा विषयी प्रचंड अभिमान आहे.
सहजच एक विचार मनात येतो जर हे पानिपतचे तिसरे युद्ध अब्दाली आणि शीखा मधे झाले असते तर आज तेथे खुप मोठा गुरुद्वारा उभा असता , हजारो लोक लंगर मधे जेवले असते. आणि पनिपतला सचखंड सारखी ट्रेन सुरु असती. वास्तविक मराठी त्यागा मुळेच शीखाचा पुढचा मार्ग सुकर झाला आहे.
त्या मुळे प्रत्येक मराठी माणसाने पनिपतला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्याच पराक्रमाची उपेक्षा आपण थांबवली पाहिजे. आणि पानीपत हे राष्ट्रीय स्मारक जाले पाहिजे.
जय महाराष्ट्र