Thursday, 20 October 2011

छत्रपती शिवाजी -राष्ट्रीय नेतृत्व


आपण सर्व  महाराजाविषयी जे काही वाचले आहे ते सर्व श्रीमान योगी, राजा शिव छत्रपती , नाथमाधव या  कादंबरी तून वाचले आहे. त्या सर्वामधून  महाराजाच्या खऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख होत नाही. या कादंबऱ्या मध्ये त्यांच्या आयुशाशी निगडीत प्रसंगाचे वर्णन आहे. माझ्या वाचनात नुकतेच एक हिंदी पुस्तक आले नाव आहे "छत्रपती शिवाजी" लेखक आहे प्रभाकर माचवे , या पुस्तकात एक प्रकरण आहे , शिवाजी कि महानंता,  यात त्यांचे सविस्तर वर्णन दिले आहे . का शिवाजी महाराज इतके यशस्वी का  झाले? त्यांच्या इतर वर्णना पेक्षा नवीन व्यक्तिमत्वाची ओळख होते. या विषयी  इतके सविस्तर वर्णन कुठेच वाचले नाही.एक राष्टीय नायक म्हणून वर्णन केले आहे .यात त्यांचा आयष्यपट हि सविस्तर दिला आहे  त्यामुळे आपणही महाराजाना  महाराष्ट्रया पुरते मर्यादित  न ठेवता स्वातंत्र्य प्रेरणा म्हणून पाहिले पाहिजे. आणि त्यांच्या चरित्रापासून  प्रेरणा घेऊन  आपण हि यशस्वी झाले पाहिजे.
  खास शिव भक्तासाठी   पूर्ण प्रकरण अपलोड  केले आहे , प्रकरण हिंदी मध्ये असल्यामुळे अमराठी  शिवभक्तांना सुधा  महाराजच्या  व्यक्तिमत्वाची खरी ओळख होईल.
जय भवानी जय शिवाजी 
















1 comment:

  1. चांगले वाटले म्हणून शिव भक्ता साठी अपलोड केले बाकी दुसरा कुठला हि हेतू नाही

    ReplyDelete