२००९ मध्ये सातारा मुक्कामी असताना प्रतापगडला जाण्याचा योग आला. निम्मित होते शिवप्रतापदिन. अफजलखान खान वधाचा दिवस प्रतापगडावर सातारा नगर परिषदे तर्फे शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.दिवस होता २४ नोवेबेर २००९ . पेपर मध्ये आधीच वाचल्या मुळे जाण्याचे नक्की केले होतेच. असे क्षण मी सहसा सोडत नाही. सकाळीच ४ वाजता उठून रिक्षा स्टोप ला आलो . इतक्या सकाळी रिक्षा भेटणे अवगड होते. बस स्टोप ३ किलोमेटेर असल्याने चालतच निघालो . परंतु शिव कृपेने पाच मिनिटात रिक्षा मिळाली आणि बस टोप ला पोहोचलो .६ ची सातारा रोहा बस मिळाली आणि ९ वाजता वाडा कुभरोशी या प्रताप गडा च्या पायथा पाशी पोहोचलो. सातारा प्रतापगड अंतर ८०KM आहे. परंतु घाट रस्त्या मुळे वेळ लागतो . वाटेत वाई ,पाचगणी , महाबळेश्वर पसरणी आणि रड तोंडीचा घाट लागतो. रस्त्या तील सकाळचा प्रवास अप्रतिम आहे . महाराजा च्या युद्ध नीती जबरदस्त आहे , त्यांनी खानाला या घाट रस्त्या तून प्रतापगडच्या पायथ्याशी येण्याच भाग पाडले. हा भाग जबरदस्त आहे. झाडी आजही घनदाट आहे. या किल्ल्याला भेट देऊन प्रत्येक शिवप्रेमींनी याची स्वतः अनुभूती घेतलीच पाहिजे. याच प्रताप गडा च्या युद्धा पासून महाराजाची दखल अखंड हिंदुस्तानात घेतली गेली.
वाडा कुभरोशी गावातून जीपने गडाच्या पायथा पाशी पोहोचलो. वाटेत अफजल कबर लागते तेथे २४ तास पहारा असतो. गडा वरील भवानी मातेचे दर्शन घेऊन गडा वरील शिव पुतळ्या पाशी पोहोचलो . तेथे विविध कार्य क्रमाचे आयोजन केले होते. मिरवणूक , मर्दानी खेळ, पोवाडे, शिव पुतळ्या वर हेली कॉपतर वरून पुष्पा वृष्टी बी जी शिर्के मार्फत करण्यात आली.
मध्यंतरी वेळ काढून पूर्ण गडा च्या तट बंदीला प्रदक्षिणा मारली ५-६ KM असेल तेथून कोकण चा नजारा अप्रतिम आहे. येथे दिवसाही रातकिड्याचा आवाज येतो तर रात्री काय अवस्था असेल?या भेटीत हा गड महाराजाचे १३ वे वंशज छत्रपती उदयनराजे यांच्या मालकीचा असल्या चे समजले
२ वाजता कार्यक्रम संपल्या वर maha प्रसाद घेऊन खाली उतरत असताना बाले किल्ल्या पाशी इतिहासकार प्रो. नामदेवराव जाधव यांची ची भेट झाली सोबत शिवभक्त पत्रकार दत्ताजी नलावाडे होते, त्यांच्या सोबत परत पूर्ण गड बगून आलो ईतिहासिक दृष्टीने गडा ची नवीन ओळख झाली. अफजल वधाचा शास्त्रीय दृष्टीने नवीन अभ्यास झाला . त्यांनी लिहिले ली सर्व पुस्तके विकत घेतली.
नामदेव रावची सर्व पुस्तके महाराजाचे शास्त्रीय दृष्टी ने वरण करतात वाचा शिवराय १ आणि २ . खाली भवानी हस्त कला केन्द्रा मध्ये थांबलो. परतीचा प्रवास वाई पर्यंत त्यांच्या सोबत केला. वाटेत पार गावातील शिवकालीन पुला ला भेट दिली त्याची अवस्था आजही चांगली आहे.
पूर्ण दिवस इतिहासकाराच्या सोबत शिव स्मरणात गेला . आणि रात्री ८ वाजता घरी पोहोचलो .
लेख खरोखर चांगले आहेत. फक्त शुद्ध लेखनाच्या बाबतीत आपण थोडे अधिक लक्ष घालावे असे मला वाटते. मुळात इंटरनेट मराठी भाषा सफाईदारपणे टाईप करणे हे अतिशय कठीण काम आहे हे मला मान्य आहे. पण ज्या हेतूने या ब्लॉगची निर्मिती केलेली आहे, त्या हेतूसाठी आपण शुद्ध लेखनाकडे अधिक लक्ष देणे हे गरजेचे म्हणा किंवा महत्त्वाचे म्हणा पण आवश्यक असेच आहे. बाकी लेख उत्तम असाच आहे !
ReplyDelete